Government of Maharashtra | महाराष्ट्र शासन
9158406160
assk178389@gmail.com
PIN: 416209

भौगोलिक माहिती

स्थानिकता

सोनारवाडी हा गाव कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यात येतो.

भौगोलिक संरचना

सोनारवाडी समुद्रसपाटीपासून सुमारे ५०० ते ७०० मीटर उंचीवर स्थित आहे. सोनारवाडी ता.भुदरगड हे सह्याद्री पर्वतरांगांच्या पायथ्याजवळ वसलेले गाव, भूआकार (Topography) डोंगराळ व सपाट प्रदेशाचा मिश्र भाग,काही ठिकाणी लहान टेकड्या व उतार शेतीसाठी योग्य सपाट जमीनही उपलब्ध आहे.

जलवायू

सोनारवाडी मध्ये उन्हाळ्यात तापमान ३५-४०°C आणि हिवाळ्यात १०-१५°C असते.

कृषी

सोनारवाडी मधील प्रमुख व्यवसाय शेती आहे. प्रमुख पिके भात (तांदूळ) – पावसाळी हंगामात मुख्य पीक ऊस – प्रमुख नगदी पीक मका, ज्वारी, बाजरी – खरीप व रब्बी हंगामात भाजीपाला – भेंडी, वांगी, मिरची, टोमॅटो

प्राकृतिक साधनांची उपलब्धता

सोनारवाडीच्या आजूबाजूला काळी व लाल माती आहे.

संस्कृती आणि इतिहास

सोनारवाडी मध्ये ऐतिहासिक व सांस्कृतिक स्थळे आढळतात. सोनारवाडी हे भुदरगड तालुक्यातील एक छोटे पण सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध गाव आहे. हे गाव कोल्हापूर जिल्ह्यात येते. या भागात पारंपरिक ग्रामीण जीवनशैली, लोकपरंपरा आणि ऐतिहासिक वारसा आजही जतन केला जातो.